चिंचवड (Pclive7.com):- धारदार शस्त्राने भोसकून महिलेची हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि.१६) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास लक्ष्मीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे उघडकीस आली. ज्योती नवनाथ केसकर (२९, रा. लक्ष्मीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्या माहिलेचे नाव आहे.
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती वाल्हेकरवाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला होत्या. त्या मूळच्या बेळगाव येथील रहिवासी असून त्यांचे पती व मुले गावी असतात. ज्योती या आपल्या एका मैत्रिणीसह वाल्हेकरवाडी परिसरात राहण्यास होत्या.
दरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्याच्या पोटात धारदार शस्त्राने भोकसून त्यांचा खून केला. त्यानंतर बाहेरून कडी लावून तो निघून गेला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी ज्योती यांना त्वरित रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घरातील कोणतेही मौल्यवान साहित्य चोरीला गेले नसल्याने हा खून चोरीच्या उद्देशाने झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group