पुणे (Pclive7.com):- जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधुन सामर्थ्य प्रबोधिनी दापोडी शाखेच्या वतीने दापोडी मधील पवना घाट व परिसराची स्वच्छता करण्यात आली. या दरम्यान पवना घाट व परिसरामध्ये खुप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या व दारुच्या बाटल्या आढळल्या असुन, दरम्यान स्वच्छता करताना कार्यकर्त्यांनी पवना घाट व परिसरातील विविध भागात स्वच्छता केली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुशांत भिसे यांनी आरोग्य निरीक्षक चव्हाण यांची भेट घेऊन सदर परिसराची आठवड्यातुन एकदा तरी स्वच्छता व्हावी आणि सदर ठिकाणी दारु पिणाऱ्यांवर कार्यवाही व्हावी अशी विनंती केली. तसेच दापोडी शाखेचे अध्यक्ष आकाश काटे यांनी भविष्यात कार्यवाही न झाल्यास महापालिका आयुक्त व महापौर यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.
या दरम्यान स्वच्छता मोहिमेमध्ये यश काटे, अनिकेत काटे, ओंकार काटे, तनया, मयुरी काटे, सलोनी गावडे, संकेत एस.व्ही.वाळंज पियुष भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group