पिंपरी (Pclive7.com):- अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एका रेकॉर्डवरील आरोपीला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. वाकड येथे १३ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
पोलिस हवालदार संदीप सोमनाथ गवारी यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शहनवाज मुस्ताक शेख (२०, रा. पत्राशेड, निगडी मुळगाव – बिहार) याला अटक करण्यात आली आहे. पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख याने आपल्या ताब्यात विनापरवाना पिस्तूल बाळगले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. वाकड पोलिस तपास करत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती निता गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस. चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अनिरुध्द सावर्डे, पोलीस अंमलदार वंदु गिरे, संदीप गवारी, दिपक साबळे, विजय घाडगे, विजय भुसारे, राम तळपे, तात्यासाहेब शिंदे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे यांनी मिळून केली असून पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक एस.एस. चव्हाण करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group