चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड मतदार संघातील सध्याचे चित्र पाहिले तर असं दिसत आहे की शेवटच्या दोन दिवसात चिंचवड विधानसभेचे गणित फिरणार असून अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर लीड घेतील अशी परिस्थिती आहे. पिंपरी चिंचवड या शहराला उद्योगनगरी अशी ओळख आहे, ती सर्वश्रुत आहे. परंतु नव्याने सांस्कृतिक नगरी म्हणून पिंपरी चिंचवड शहर ओळखले जाऊ लागले याचे श्रेय भाऊसाहेब भोईर यांना दिले पाहिजे. कारण सुप्रसिद्ध आणि दिग्गज कलाकार आणून त्यांचे कार्यक्रम आयोजित करणे आणि शहरातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे हे कार्य भाऊसाहेब भोईर यांच्या हातून अविरतपणे घडत आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष असलेले आपले भाऊसाहेब आता चिंचवड विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार आहेत. कपाट या चिन्हावर ते निवडणूक लढवत असून मतदार संघात जोरदार प्रचार सुरू आहे. काल दिनांक १६ रोजी उद्योग नगर, दळवी नगर, भोईर नगर, इंदिरा नगर, प्रेमलोक पार्क याठिकाणी पदयात्रा झाली. लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उद्योग नगर, दळवी नगर, भोईर नगर, इंदिरा नगर, प्रेमलोक पार्क परिसर भाऊसाहेब भोईर यांचा बालेकिल्ला. या भागातून गेली अनेक वर्ष ते नगरसेवक म्हणून उत्तम कार्य करीत आहेत.
एकजुटीने भाऊसाहेबांच्या पाठीशी आहोत. अशा भावना येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या. बालेकिल्ल्यात एक गठ्ठा मतदान होणार असल्याचा विश्वास येथील कार्यकर्ते आणि पदाधिकारी सांगत आहेत. या भागात भाऊसाहेबांनी केलेले कार्य लोकं कधीही विसरणार नाहीत त्यामुळे यंदा भाऊसाहेबांना विधानसभेत पाठवण्यासाठी कंबर कसून कार्यकर्ते आणि नागरिक कामाला लागले आहेत.
उद्योग नगर, दळवी नगर, भोईर नगर, इंदिरा नगर, प्रेमलोक पार्क या परिसरात स्वतः भाऊसाहेब यांचे वास्तव्य असल्यामुळे परिसर भयमुक्त व शांत आहे. त्याच पद्धतीने संपूर्ण चिंचवड मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी मतदार संघातील विविध भागातील लोकांनी अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्या पाठीशी उभे राहून भाऊसाहेबांना आमदार करावे असे आवाहन कार्यकर्ते लोकांना घरो घरी जाऊन सांगत आहेत. या भागात झालेल्या पदयात्रेचे वैशिष्ट्ये म्हणजे मतदार स्वतः भाऊसाहेब भोईर यांच्या पदयात्रेत सहभागी होऊन सकारात्मक वातावरण निर्माण करीत आहेत.
काही उमेदवारांना प्रचार रॅलीत पैसे देवून लोकं आणावी लागत आहेत. पण कसलीही अपेक्षा न ठेवता प्रचंड संख्येमध्ये लोकं भाऊसाहेबांच्या रॅलीत सहभागी होत आहेत असे चित्र मतदार संघात जागोजागी पाहायला मिळत आहेत. ही जमेची बाजू चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना विधानसभेत पाठवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
मी गेली २५ वर्ष राजकारण आणि समाजकारणात आहे. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य संपूर्ण देशात माहिती आहे. साहित्य कला क्रीडा क्षेत्रातील भरीव कार्य देखील सर्वश्रुत आहे. शिवाय उद्योग नगर, दळवी नगर, भोईर नगर, इंदिरा नगर, या भागात नगरसेवक म्हणून गेली २५ वर्ष केलेले कार्य लोकांना माहीत असल्यामुळे त्यांना वेगळं सांगायची गरज नाही. चिंचवड विधानसभा निवडणुकीत मला कपाट हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून लोकांना वाटतं की माझ्या प्रचार रॅलीत सहभागी होऊन हातभार लावावा.
केवळ याच भागात नव्हे तर संपूर्ण चिंचवड मतदार संघात वेगवेगळ्या भागातून लोकांचा मला सकारात्मक पाठिंबा आहे. परिवर्तन घडवून आणण्यासाठी लोकं आणि मी स्वतः सज्ज आहोत. वेगवेगळे पक्ष आणि संघटना मला स्वतः येवून भेटतात पाठींबा देतात त्यामुळे मला मोठे बळ मिळाले असून यंदा लोकांच्या आशीर्वादाने विधानसभेत चिंचवड च्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रतिनिधित्व करेल असा विश्वास आहे. असा विश्वास भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केला.