पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीत खराळवाडी येथील बाल भवन येथील मतदान केंद्रावर कष्टकरी जनता आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे मतदान करण्यासाठी सहकुटुंब गेले असता व त्यांनी ओरिजनल आधार कार्ड दाखवूनही मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी त्यांना मतदानापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अमित दीक्षित, दीपक वाकडे व संबंधित महिला अधिकारी यांनी तुमचे आधार कार्ड चालणार नाही 14 प्रकारची कागदपत्र लागतात, ती घेऊन या अशा प्रकारची विचित्र मागणी केल्याचा आरोप बाबा कांबळे यांनी केला.
यावेळी बाबा कांबळे म्हणाले जिल्हाधिकारी यांनी नुकताच एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केला असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की 14 पैकी कोणत्याही एका कागदपत्राच्या आधारे मतदान करण्याचा अधिकार आहे. परंतु संबंधित अधिकारी यांनी आधार कार्डच्या आधारावर मतदान होणार नाही, अशा भूमिका घेतली. तुमचे ओरिजनल वोटिंग कार्ड घेऊन या, वोटिंग कार्ड नसेल तर तुम्हाला मतदान करता येणार नाही अशा प्रकारे आडमुठे धोरण अवलंबले.
अशाच प्रकारे अनेक नागरिकांना संबंधित केंद्रावर त्रास झाला असून याप्रकरणी बाबा कांबळे हे तक्रार करत असताना या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुगळ हे संबंधित घटनास्थळी आले. त्यांनी देखील तुम्ही इथं थांबू नका, बाहेर व्हा, असे म्हणत त्यांनी देखील न्याय न देता बघ्याची भूमिका घेत याप्रकरणी पक्षपात केला, असा आरोप बाबा कांबळे यांनी केला.

























Join Our Whatsapp Group