पिंपरी (Pclive7.com):- महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध रहा .., बलात्कार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करा.., महिलांवर अन्याय, अत्याचार होत असताना ते केवळ मोबाईलमध्ये रेकॉर्ड न करता ते थांबवण्यासाठी पुढाकार घ्या .., मुली – महिलांचा आदर करायला मुलांना शिकवा असा संदेश देत महिलांवरील अत्याचारा बाबत भाष्य करणारा एक आगळा वेगळा फॅशन शो आज संपन्न झाला.
कशीश सोशल फाउंडेशन आणि कशीश प्रोडक्शनच्या वतीने महिला अत्याचारा विरोधात जनजागृतीसाठी ‘स्काय गोल्ड मिस, मिसेस, मिस्टर,किड्स इंडिया ईलाईट’2024 सीझन -2 फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. हा फॅशन शो एल्प्रो मॉल सभागृह, चिंचवड येथे पार पडला. यामध्ये महिलांवर वारंवार होत असलेल्या अत्याचारा विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने तसेच विविधतेतून एकता असा संदेश देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून स्काय गोल्ड चे डायरेक्टर आनंद शंकर माळी, शोरुम हेड सादिक, शमीम, डी.वाय.पाटील फॅशन टेक्नॉलॉजी पिंपरी कॉलेजचे शिक्षक, विद्यार्थी, वेलनेस वर्ल्डच्या डॉ. अर्चना माळी, स्वरूप रॉय, उमेश महाजन, भूषण पाटील, स्नेहल संग्राम चौघुले, प्रदीपकुमार बनसोडे, महेश गायकवाड, डॉ. शशिकांत शेटे, विजय दगडे, आयोजक आणि पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांसह सिनेमा, फॅशन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पॅडमॅन योगेश पवार म्हणाले, अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे की असे प्रकार घडण्या पासून थांबवणे. या फॅशन शो च्या माध्यमातून आम्ही नागरिकांमध्ये या विषयी जनजागृती करण्याचे काम करत आहोत.आशा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचला असावा.
महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात ‘महिला सुरक्षा’ या थीमवर एक फॅशन वॉक करण्यात आला. यामध्ये मॉडेल्सनी आणि आयोजकांनी महिला सुरक्षे विषयी संदेश फलक घेवून रॅम्प वॉक केला. तसेच यामध्ये स्पर्धकांनी विविधतेतून एकता संदेश देत भारतातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करत त्या त्या राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन या फॅशन शोमध्ये घडले.स्पर्धेत 100 पेक्षा अधिक स्पर्धकांचा समावेश होता.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून पूजा वाघ, प्रियंका मिसाळ,माधवी बोकील, रिया चौहान, सोनिका राव यांनी काम पाहिले.
स्पर्धेतील विजेते..
विजेते:- माधवी शानभाग, प्राजक्ता साळवे, सिंपल खन्ना, करण बब्बर, भुवी ढेंगळे, आरव पटेल, आराध्या येल्डी, सर्वंकष साळवे,
उपविजेते:- निशा मोरे, तृप्ती मोरे, मोनिका शर्मा, रसिका गोसावी, अमृता कुलकर्णी, दक्षा जखाडी, संदीप साळवे, अनिरुद्ध कांबळे, वीर क्षीरसागर, सृष्टी संदिपम, दुर्वा तेली, संविधा ढेंगळे, मितांश येल्डी, प्रतिष्ठा सोनवणे, हृदय बापट.