

गुरूवार, १२ डिसेंबर रोजी सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्याच्या १४व्या निर्णायक सामन्यात डिंग लिरेनचा पराभव करून सर्वात गुकेश विश्वविजेता ठरला. गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर विश्वविजेता ठरणार दुसरा भारतीय ठरला.
गुकेश आणि डिंग यांनी गुरुवारी सामन्याच्या अंतिम डावात प्रत्येकी ६.५ गुणांसह बरोबरी साधली. १४व्या डावात, ज्यात डिंग पांढऱ्या सोंगट्यासह खेळत होता, तो सामन्याच्या ५३व्या चालीत डिंगने चूक होईपर्यंत अनिर्णित दिशेने वाटचाल केली होती. गुकेशने खेळत राहत डिंगवर दबाव आणणं सुरू ठेवलं आणि यात गतवर्षीचा विश्वविजेता लिरेन फसला. लिरेन आणि गुकेश यांच्यातील अंतिम डावातील सामना ही ड्रॉ होण्याच्या मार्गावर होता पण डिंगच्या हातून मोठी घोडचूक घडली आणि त्याच्या हातातून सामना निसटला.
डी. गुकेश या ऐतिहासिक विजयानंतर म्हणाला, “सामन्यात जेव्हा मला कळलं की लिरेनने घोडचूक केली आहे, तो माझ्या जीवनातील खूप आनंदाचा क्षण होता. आपल्या सर्वांनाच माहितीय की लिरेन उत्कृष्ट खेळाडू आहे. तो बुद्धिबळच्या इतिहासातील एक उत्कृष्ट खेळाडू राहिला आहे. त्याने या सामन्यादरम्यान किती दबाव झेलला आणि शेवटपर्यंत हार न मानता दाखवून दिलं की खरा चॅम्पियन कसा असतो. माझ्यासाठी तो खरा विश्वविजेता आहे. मी जो क्षण अनुभवतो आहे तो अनुभवण्याचं प्रत्येक बुद्धिबळपटूचं स्वप्न असतं आणि आज मी माझं स्वप्न जगतो आहे. सर्वात आधी देवाचे खूप आभार.”






















Join Our Whatsapp Group