पिंपरी (Pclive7.com):- नागरिकांनी आपल्या आरोग्याविषयी जागरूक राहावे, यासाठी पिंपरी येथे हॅपिनेस स्ट्रिटचे आयोजन करण्यात आले होते. माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाची सुरुवात डब्बू आसवानी यांच्या निवासासमोर आरोग्याविषयीची मशाल पेटवून झाली. या उपक्रमाला पिंपरीतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
पिंपरीतील ‘ड’ प्रभाग शाळेजवळीत खुल्या मैदानात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगा, झुंबा, गाणे, नृत्य, लुडो, लाईव्ह म्युझिक यांच्यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व वयोगटासाठी विविध स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षिसेही देण्यात आली.
या संकल्पनेच्या यशस्वी आयोजनासाठी पवन भोजवानी, सुरज धरनानी, मनीष गिरजा, अविनाश इस्त्रानी, शोभा फिटनेस क्लब, मधू जुमानी स्टुडीओ, स्वरांश बँड यांनी सहकार्य केले. पहिल्याच दिवशी दोन हजार नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. आपले आरोग्य हीच आपली संपत्ती आहे त्यामुळे खुश रहा हा संदेश डब्बू आसवानी यांनी या उपक्रमाव्दारे दिला.