पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या परवानगीशिवाय फ्लेक्स लावल्याप्रकरणी महापालिकेने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वाकड येथे एका जीमच्या जाहिरातीचे फ्लेक्स आणि क्यूआर कोड लावल्याप्रकरणी जीम चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौधरी पार्क वाकड येथील सिग्मा वर्ल्ड फिटनेस या जीमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी परवाना निरीक्षक राजू वेताळ यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींनी पाच फ्लेक्स आणि ५० क्यूआर कोड महापालिकेची परवानगी न घेता चौधरी पार्क, शंकर कलाटे नगररोड, पोस्टल कॉलनी आणि मुरारी पेट्रोल पंप परिसरात लावले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.