पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘अ’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून नगरसेविका अनुराधा गोरखे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. गोरखे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित असून त्यांच्या नावावर शुक्रवारी शिक्कामोर्तब होईल.
‘अ’ प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी मंगेश चितळे यांच्याकडे गोरखे यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी नगरसेवक केशव घोळवे, शीतल शिंदे, नगरसेविका शर्मिला बाबर, कोमल मेवाणी, भाजपचे प्रदेश सदस्य अमित गोरखे, दिनेश देशमुख आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभाग समिती अध्यक्षांची मुदत एप्रिलअखेर संपणार आहे. त्यांच्या जागी नविन अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी आज अर्ज भरण्यात आले. सत्ताधारी भाजपकडून नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी अर्ज भरला आहे. त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे.






















Join Our Whatsapp Group