पिंपरी (Pclive7.com):- आजच्या स्पर्धेच्या व ताणतणावाच्या युगात पुस्तकेच माणसाला आधार देतात व नैराश्यातून बाहेर काढू शकतात, असे प्रतिपादन अंशुल प्रकाशनचे संचालक विजय जगताप यांनी आज येथे केले.
जागतिक पुस्तक दिनानिमित्त संत तुकारामनगर येथील सोहम लायब्ररी येथे झालेल्या बालवाचन मेळाव्यात ते बोलत होते. लायब्ररीचे संस्थापक जगन्नाथ नेरकर ग्रंथपाल वर्षा बोरसे, प्रदीप बोरसे आदी यावेळी उपस्थित होते.
पुस्तकांसारखा दुसरा कोणता मित्र असू शकत नाही. वाचन ही प्रेरणा असून ही चळवळ सध्या धोक्यात आली असली तरी संपलेली नाही, अशी माहिती जगन्नाथ नेरकर यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अवांतर पुस्तके वाचनाची गोडी लागावी यासाठी ऐतिहासिक चरित्रे, विज्ञानविषयक तसेच संस्कारक्षम पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती.






















Join Our Whatsapp Group