पिंपरी (Pclive7.com):- शिरुर आणि मावळ लोकसभा मतदार संघावर भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दावा केला होता. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. या ४८ जागांपैकी काही जागांचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी घेऊ द्या, समोर ओबामा उभा राहिला तरी माझी काही हरकत नाही. कुणीही समोर आले तरी चालेल असे सांगत चौथ्यांदा विजयश्री खेचून आणण्यासाठी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दंड थोपटले आहेत.
पिंपरी येथे शिवसेना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख योगेश बाबर आदी उपस्थित होते.
मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघावर दावा करणार असल्याचे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. याबाबत खासदार आढळराव यांना विचारले असता त्यांनी या दाव्याची खिल्ली उडविली. ते म्हणाले, समोर विरोधक कोणीही असला तरी आम्ही त्याला घाबरत नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मला आणि श्रीरंग बारणे यांना कोणताही धोका नाही. बराक ओबामा जरी समोर आला, तरी आम्ही घाबरत नाही. समोर कोणीही विरोधक असला तरी त्याच्यासोबत लढण्यास आम्ही तयार आहोत. विरोधक कोणीही असो त्याचे स्वागत करतो, असेही खासदार आढळराव म्हणाले.






















Join Our Whatsapp Group