पिंपरी (Pclive7.com) :- इंद्रायणी एक्सप्रेस रेल्वेने मामाच्या गावी निघालेल्या तेरा वर्षाच्या मुलाचा रेल्वेतून खाली पडून दुदैवी मृत्यू झाला. हा अपघात चिंचवड रेल्वे स्थानकावर सकाळी घडला.
अर्जुन कृष्णा रमेशराव (वय १३, रा. डोबिंवली वेस्ट, मुंबई) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन हा मुंबईचा असून तो त्याच्या मामाकडे सोलापूरला निघाला होता. इंद्रायणी एक्सप्रेस रेल्वेने तो मामासोबत मुंबईहून सोलापूरला बुधवारी सकाळी निघाला होता. चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ आल्यानंतर त्याचा रेल्वेच्या दारातून तोल गेल्याने तो खाली पडला. यामध्ये त्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास लोहमार्ग पोलिस करत आहेत.
दुसरी घटना बुधवारी सकाळी पिंपरी रेल्वे स्थानकावर घडली. अंदाजे ४५ वर्षीय पुरुष लोहमार्ग ओलांडत असताना रेल्वे गाडीची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. यांची ओळख अद्याप पटलेली नसून लोहमार्ग पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवला आहे.






















Join Our Whatsapp Group