पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे (ता.मावळ,जि.पुणे) येथील स्टेडियमवर शुक्रवारी (ता.३१) सायंकाळी ७ वाजता भारत आणि इंग्लंड संघात होत असलेल्या टी-२० श्रृंखलेतील चौथ्या क्रिकेट सामन्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातर्फे तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक विभागाकडून देखील स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.

स्टेडियमच्या ठिकाणी २ पोलीस उपायुक्त, ३ सहायक पोलीस आयुक्त, २० पोलीस निरीक्षक, ५५ पोलीस उपनिरीक्षकांसह साडेचारशेहून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहेत. सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर येणा-या क्रिकेट प्रेमींच्या वाहनांच्या पार्किंगसाठी १२ स्लाॅट उपलब्ध करण्यात आलेले आहेत. कुणीही थेट स्टेडियमच्या ठिकाणी कोणतेही वाहन घेऊन न येता नेमून दिलेल्या ठिकाणीच वाहनांचे पार्किंग करावे. पाणी बाटल्या, कापडी फलक, पिशव्या, पर्स अशा कोणत्याही वस्तू स्टेडियमवर घेऊन येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. क्रिकेट प्रेमींनी नियमांचे पालन करुन सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांनी केले आहे.
Tags: गहुंजे स्टेडियमतळेगाव पोलीसपिंपरी चिंचवड पोलीसपोलीस बंदोबस्तभारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामना





















Join Our Whatsapp Group