
नागरिकांना होत असलेला त्रास
# कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अनेक घरांमध्ये पुरेसे पाणी पोहोचत नाही.
# पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित नसल्यामुळे नागरिकांना वेळेत पाणी साठवणे कठीण जाते.
# वारंवार वीजपुरवठा खंडित होतो, त्यामुळे पाणीपुरवठा अधिकच विस्कळीत होतो.
# शहराच्या इतर भागांना नियमित आणि योग्य दाबाने पाणी मिळत असताना, याच भागांतील नागरिकांवर अन्याय होत आहे.

यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, सध्या एक पंप दुरुस्तीसाठी बंद आहे, त्यामुळे दुसऱ्या पंपाच्या माध्यमातूनच पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, दुसरा पंप लवकरच दुरुस्त होईल आणि पुढील ८ ते १० दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस यांनी या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे. “आमच्या भागातून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जातो, तरी देखील आम्हाला कमी दाबाने आणि अवेळी पाणीपुरवठा होत आहे, ही शोकांतिका आहे.” असे त्यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group