पिंपरी (Pclive7.com):- दहावी, बारावीच्या परीक्षा सध्या सुरू झाल्या असून शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील सुरू होणार आहेत. या परीक्षांच्या कालावधीत पिंपरी ते निगडी मेट्रोचे सुरू असलेले काम रात्रीच्या वेळेत बंद करण्यात यावे अशी मागणी पिंपरी चिंचवड भाजपाचे चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे.

काळभोर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निगडी-मेट्रो रेल्वे प्रकल्प काम पिंपरी ते निगडी ह्या मुंबई पुणे महामार्गावर सुरू असून रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत मेट्रो रेल्वे प्रकल्प काम बंद करण्यात यावे. रात्री मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या ड्रिल मशीनने रस्त्यावर खड्डे खोदण्यात येत असून त्यामुळे खुप मोठा आवाज येत असून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असून झोप मोड होत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांची दहावी बारावीची परिक्षा सुरू झाली आहे. या आवाजामुळे विद्यार्थ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. आजूबाजूला रुग्णालय नागरी वस्ती मोठ्या प्रमाणावर असून रात्रीच्या वेळी मेट्रो रेल्वे काम त्वरित बंद करण्यात यावे.
ह्या संदर्भात मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी ह्यांनी स्वतः ताबडतोब दखल घेऊन रात्रीच्या वेळी प्रत्यक्ष निगडी मधुकर पवळे उड्डाणपूल ह्या ठिकाणी येऊन पाहणी करून निर्णय घेण्यात यावा. नागरिकांना विनाकारण त्रास देण्याचा हा प्रकार असून रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत मेट्रो रेल्वे काम त्वरित बंद करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सचिन काळभोर यांनी दिला आहे.





















Join Our Whatsapp Group