पिंपरी (Pclive7.com):- सेक्टर १२ प्राधिकरण भोसरी येथील रत्नदुर्ग सोसायटीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त शिव जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथून आणलेल्या शिवज्योतीची रत्नदुर्ग सोसायटीच्या वतीने स्वागत आणि पूजन करण्यात आले.
यावेळी रत्नदुर्ग सोसायटीच्या महिलांनी शिवरायांचा पाळणा म्हणून शिवजयंती उत्साहात साजरी केली. तसेच याप्रसंगी मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले होते.