पिंपरी (Pclive7.com):- निगडी सेक्टर २७ प्राधिकरण येथील श्री गजानन महाराज मंदिर चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने दि.१९ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवात प्रकट दिन मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी शिल्पा आठल्ये यांनी भावगीत आणि गायिक आशुतोष सुरजुसे, मोनिका देशमुख यांनी अभंगवारी हा भक्ती संगीताचा कार्यक्रम सादर केला. हास्यसम्राट फेम प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी हसवणूक कार्यक्रमातून रसिकांना हसवले. गायिका ज्योती गोराणे यांचा भावगीत भक्ती गीताचा कार्यक्रम संपन्न झाला.बिग बॉस फेम ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (आळंदी) यांनी कीर्तन सेवा केली. गजानन महाराज मंदिरात रॉबिन हूड आर्मी, निसर्गराजा मित्र जीवांचे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीरात २०० जणांनी रक्तदान केले. दिवसभरात सुमारे ५० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी माजी नगरसेवक राजू मिसाळ, शैलेजा मोरे, अमित गावडे, माजी महापौर आर एस कुमार, धनंजय काळभोर पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी आदी मान्यवर उपस्थित होते. दिवसभर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष रामभाऊ पिसे, माणिक जाधव, भाऊसाहेब खडसे, विजय बेहेरे, अभय तारक, महादेव कतले, देविदास हरमकर, रवि मिरजी, सहदेव जानोरकर आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.






















Join Our Whatsapp Group