पिंपरी (Pclive7.com):- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंदजी कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत शहरातील सर्व नवनिर्वाचित आमदार व संघाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं ६ वा. सावरकर सदन, सेक्टर २५ निगडी प्राधिकरण याठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, विधानपरिषद आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, अनुप मोरे (प्रदेशाध्यक्ष, युवा भाजपा महाप्रदेश), निखिल लातुरकर (प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र) या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तरी, समाज बांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group