पिंपरी (Pclive7.com):- वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आता ॲक्शन मूडमध्ये आले आहेत. पोलीस उपायुक्त परिमंडळ -३ यांच्याकडून तब्बल २२ सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ -३ चे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी या सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्याच्या हद्दीतुन तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.
०१) शकील ख्वाजा काझी, वय २६ वर्ष विठ्ठल नगर लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी (घातक हत्यारांनी दुखापत पोचवणे, दरोडा, धमकावणे, मारहाण करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दहशत माजवणे, मनाई आदेशाचा भंग करणे, बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन प्रतिबंध अधिनियमान्वये कलमांतर्गत यासारखे एकूण ०३ गुन्हे दाखल. – २ वर्षांकरिता तडीपार)
०२) धनदेवी अर्जुन कंजर भट वय ४० वर्ष रा.मोशी, (महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमांतर्गत बेकायदेशीर व अवैध हातभट्टी तयार दारु जवळ बाळगुन विक्री करणे यासारखे एकूण ०५ गुन्हे दाखल. – १ वर्षाकरिता तडीपार)
०३) शारदा देवी अरविंद चव्हाण (नट) वय ३४ वर्षे, वडमुखवाडी. (महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमांतर्गत बेकायदेशीर व अवैध हातभट्टी तयार दारु जवळ बाळगुन विक्री करणे यासारखे एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत. – १ वर्षाकरिता तडीपार)
०४) निशा सत्यवान कुंभार, वय ३०, यमाई नगर दिघी, (महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमांतर्गत बेकायदेशीर व अवैध हातभट्टी तयार दारु जवळ बाळगुन विक्री करणे यासारखे एकूण ०६ गुन्हे दाखल आहेत. – १ वर्षाकरिता तडीपार)
०५) सुनिता पारस भाट, वय २५ वर्ष, मुक्ताई लॉन्ससमोर चोवीसावाडी, (महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमांतर्गत बेकायदेशीर व अवैध हातभट्टी तयार दारु जवळ बाळगुन विक्री करणे यासारखे एकूण ०९ गुन्हे दाखल आहेत. – १ वर्षाकरिता तडीपार)
०६) बालाजी राजेश बिडगर, वय ४०, रा. काळे कॉलनी, देहुफाटा, चहोली (बु), (लोकसेवकाने रितसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा, जीवीतास धोका असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव, राष्ट्रीय आपत्ती अधिनियमान्वये, महाराष्ट्र जुगार कायदा कलमान्वये असे एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत. – ३ महिने तडीपार)
०७) सोपीसाप बडेसाप हवालदार, वय ४० वर्षे, रा. शांतीनगर, कॉलनी नं. १, शिवालाल मंदराजवळ, भोसरी, ता. हवेली, जि. पुणे. (महाराष्ट्र जुगार कायदा कलमान्वये ०१ गुन्हा दाखल आहे. – ३ महिने तडीपार)
०८) जयचंद नारायण इरगट, वय ४४ वर्षे, रा. जगताप मंगल कार्यालयाचे समोर, काळे कॉलनी, आळंदी देवाची, पुणे. (महाराष्ट्र जुगार कायदा कलमान्वये ०२ गुन्हे दाखल आहेत. – ३ महिने तडीपार)
०९) १. आकाश शंकर जाधव, वय २४ वर्षे, रा. टॉवर लाईन आयकॉन हॉस्पीटलजवळ त्रिवेणीनगर, निगडी, पुणे (टोळी प्रमुख) २.आशितोष नानासाहेब घोडके, वय २३ वर्षे, रा. गुरुद्त्त हौ. सोसा. तुळजाभवानी मंदिरामागे त्रिवेणीनगर, तळवडे पुणे (टोळी सदस्य) (चोरी यासारखे एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. – २ वर्षाकरिता तडीपार)
१०) दिगंबर काशिनाथ जामदारे, वय १९ वर्षे, रा. अजंठानगरकडे जाणाऱ्या रोड लगत कृष्णा शेळके यांचे घरी, गौरी निवास, भारत गॅस एजन्सी शेजारी, कस्तुरी मार्केट चिंचवड, पुणे (चोरी, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचा भंग करणे यासारखे एकूण ०४ गुन्हे दाखल आहेत. – १ वर्षाकरिता तडीपार)
११) दशरथ सिताराम कसबे, वय ४७ वर्षे, रा. पांडुरंग नेवाळे यांची खोली नेवाळेवस्ती, पाटीलनगर, चिखली, पुणे (महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमांतर्गत बेकायदेशीर व अवैध हातभट्टी तयार दारु जवळ बाळगुन विक्री करणे यासारखे एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत. – १ वर्षाकरिता तडीपार)
१२) उद्धव ऊर्फ सूरज रमेश कुटे, वय २३ वर्षे, रा. तुकाईनगर, भोसे, ता. खेड, जि. पुणे (खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, धमकावणे, शांतता भंग घडवुन आणण्याचे उद्देशाने अपमान करणे, धाकदपटशा, गैरनिरोध, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचा भंग करणे यासारखे एकूण ०४ गुन्हे दाखल आहेत. – २ वर्षाकरिता तडीपार)
१३) उत्तमसिंग रामकुमार राठोड वय ४५ वर्षे, रा. भोसे ता. खेड, जि. पुणे (खंडणी वगैरेकरीता अपहरण, गैरपरिरोध, इच्छापुर्वक दुखापत शांतताभंग घडवुन आणण्याचे उद्देशाने अपमान करणे, धाकदपटश बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचा भंग करणे, महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमांतर्गत बेकायदेशीर व अवैध हातभट्टी तयार दारु जवळ बाळगुन विक्री करणे यासारखे एकूण ०८ गुन्हे दाखल आहेत. – २ वर्षा करिता तडीपार)
१४) करण पांडुरंग सुरवसे, वय २९ वर्षे, रा. महात्मा फुलेनगर, मार्केट यार्ड, चाकण, ता. खेड, जि. पुणे (इच्छापुर्वक दुखापत पोचवणे, शांतता भंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करण, बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन प्रतिबंध अधिनियमान्वये कलमांतर्गत यासारखे एकूण ०२ गुन्हे दाखल आहेत. – १ वर्षाकरिता तडीपार)
१५) रोहन महेंद्र घोगरे, वय २२ वर्षे, रा. खंडोबा माळ, आंबेडकरनगर, चाकण, ता. खेड जि. पुणे (खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमावाचा सदस्य होवुन प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होवुन दंगा करणे, घातक हत्याराने इच्छापुर्वक दुखापत करणे, फौजदारीपात्र बलप्रयोग, धमकावणे, मारहाण करणे, बेकायदेशिर शस्त्र जवळ बाळगणे यासारखे एकूण ०६ गुन्हे दाखल आहेत. – २ वर्षाकरिता तडीपार)
१६) सुरज ऊर्फ सनी रमेश गाडेकर, वय २४ वर्षे, रा. खंडेश्वर कॉलनी, चाकण, ता. खेड, जि. पुणे (खून, खुनाचा पयत्न, इच्छापुर्वक दुखापत, गैरनिरोध, प्राण घातक हत्यारानिशी दंगा करणे, कट रचने, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, दहशत निर्माण करणे तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम कलमांतर्ग यासारखे एकूण ०६ गुन्हे दाखल आहेत. – १ वर्षाकरिता तडीपार)
१७) दिनेश नाना लुटे, वय २४ वर्षे, रा. सोमनाथ मुंगसे यांचे घरापुढे केळगाव ता. खेड, जि. पुणे. (बेकायदेशीर अग्नी शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचा भंग करणे यासारखे एकूण ०२ गुन्हे दाखल आहेत. – १ वर्षाकरिता तडीपार)
१८) शेखर नंदकुमार शिंदे, वय २९ वर्षे रा. भुसेआळी, मरकळ, ता. खेड, जि. पुणे (विनयभंग बलप्रयोग, इतरांची सुरक्षितता धोक्यात आणण्याच्या कृतीने जबर दुखापत पोचवणे, इच्छापुर्वक दुखापत पोचवणे, बेकायदेशीर जमावाचा घटक होवुन दंगा करणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचा भंग करणे यासारखे एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत. – ६ महिने तडीपार)
१९) वंती देवीदास नानावत ऊर्फ रजपुत, वय ३२ वर्षे, रा. कंजारभट वस्ती भिवरेवाडी, कोयाळी, ता. खेड, जि. पुणे (महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमांतर्गत बेकायदेशीर व अवैध गावठी हातभट्टी दारु तयार करण्याकरीता लागणारे कच्चे रसायन दारु जवळ बाळगुन, हातभट्टीची दारु भट्टी अनाधिकराने लावुन, दारु तयार करुन विक्री करणे. यासारखे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. – १ वर्ष करिता तडीपार)
२०) वसिम हुसेन शेख वय २९ वर्षे, रा.०४ नंबर शाळेजवळ आळंदी, ता. खेड जि.पुणे, मुळ कोरडे डेअरीचेवर देहुफाटा आळंदी ता.हवेली जि.पुणे (खून, खुनाचा प्रयत्न, कट रचणे, प्राणघातक हत्यारानिशी दंगा करणे, विनयभंग, शांतता भंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, मारहाण करणे, बेकायदेशीर जमावाचा घटक होवुन दंगा करणे, मनाई आदेशाचा भंग करणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, यासारखे एकूण ०७ गुन्हे दाखल आहेत. – २ वर्षाकरिता तडीपार)
२१) परिक्षित प्रकाश शेट्टी, वय २२ वर्षे, रा. तुकारामनगर, अंबिका गार्डन, तळेगाव दाभाडे, पुणे (महाराष्ट्र दारु बंदी अधिनियमांतर्गत बेकायदेशीर देशी विदेशी दारु बाटल्या जवळ बाळगुन विक्री करणे यासारखे एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत. – १ वर्षा करता तडीपार)
तसेच परिमंडळ ३ पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील १०० हुन अधिक गुन्हेगारांच्या हालचालींंवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठोस व परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांच्या तडीपार कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यात दिसुन आल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष संपर्क क्र.११२ तसेच जवळील संबंधित पोलीस ठाण्यास संपर्क साधुन माहिती कळविण्याचे आवाहन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, डॉ. शिवाजी पवार यांनी सर्व नागरीकांना केले आहे.






















Join Our Whatsapp Group