पिंपरी (Pclive7.com):- पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.२८) दुपारी साडेचारच्या सुमारास भोसरी येथील सद्गुरुनगरमध्ये ही कारवाई केली.
अरबाज सैफन शेख (वय २६, रा. सद्गुरुनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार सुमित देवकर यांनी शुक्रवारी (दि.२८) याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज शेख याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून अरबाज याच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group