
डीसीपी पवार, एपीआय जराड यांनी जीवाची बाजी लावत या टोळीला बेड्या ठोकल्या..
दोघांपैकी एक अल्पवयीन निसटला तर दुसऱ्याने थेट कोयता बाहेर काढला. बचावासाठी डीसीपींनी बंदूक बाहेर काढली. त्यानंतर ही दरोडेखोराने डीसीपींवर कोयत्याने वार केला, डीसीपी पवार थोडं मागे हटले. मात्र वार चुकवू शकले नाहीत, त्यांच्या छातीला कोयता चाटून गेला. डीसीपी पवार रक्तबंबाळ झाले. अशात त्यांनी एक गोळी झाडली, ती दरोडेखोराने चुकवली. मग एपीआय जराड दरोडेखोराला पकडण्यासाठी पुढं आले, त्याने त्यांच्यावर ही वार केला. जराड यांच्या डाव्या खांद्यावर वार झाला. मग जखमी अवस्थेत असलेल्या डीसीपींनी दुसरी गोळी थेट पायावर झाडली, यात दरोडेखोर जमिनीवर कोसळला. मग त्याला जेरबंद करण्यात आलं, दुसरीकडे पळून निघालेल्या अल्पवयीन मुलाला पथकातील इतरांनी ताब्यात घेतलं. जवळपास वीस मिनिटं पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमकीचा थरार रंगला होता. डीसीपींना छातीवर पाच टाके पडलेत. ते थोडक्यात बचवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. जराड यांना ही मोठी इजा झालेली आहे. उपचारानंतर दोघांना डिस्चार्ज देण्यात आलाय. जखमी दरोडेखोरावर उपचार सुरु आहेत, तर अल्पवयीन मुलगा ताब्यात आहे. डीसीपी पवार, एपीआय जराड आणि पथकाने तिसरा दरोडा टाकण्यापूर्वी या टोळीच्या मुसक्या आळवल्या. दसऱ्यादिवशी याचं टोळीनं एका पोलिसाच्या घरावर दरोडा टाकत, पोलिसावर हल्ला केला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात बहुळ गावात एका घरावर दरोडा टाकला, त्यावेळी त्या कुटुंबातील पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला केला होता. आता पुढचा दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना डीसीपी पवार, एपीआय जराड यांनी जीवाची बाजी लावत या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.























Join Our Whatsapp Group