मावळ (Pclive7.com):- मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या बाजूला असलेल्या आंबेगाव कॅम्पिंग साईट येथे धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. ग्रामस्थ व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बिबट्याला पकडून वनखात्याच्या ताब्यात दिले आहे.

आंबेगाव कॅम्पिंग साईट येथे आज (शुक्रवार) सकाळी एक बिबट्या उंबराच्या झाडावर बसलेला आढळून आला. त्यापूर्वी त्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक ग्रामस्थ जखमी झाला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बिबट्या झाडावरून खाली उतरला व त्याने आणखी काहीजणांवर हल्ला केला. त्यावेळी धाडसाने ग्रामस्थ व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दोरखंड व जाळीचा वापर करून बिबट्याला पकडल्याचे समजते. बाळू शिंदे (रा. शिंदगाव, ता. मावळ) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.





















Join Our Whatsapp Group