पिंपरी (Pclive7.com):- थेरगाव येथील गणेशनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा महिला दिनाचे औचित्य साधून गणेनगर ज्येष्ठ नागरिक संघ थेरगावच्या वतीने सामाजिक, राजकीय, क्रीडा, वैद्यकीय, पत्रकारिता, मानवी हक्क, सांप्रदायिक, क्षेत्रातील १० कर्तुत्ववान रणरागिणी महिलांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये माया बारणे (राजकीय), करिष्मा बारणे (समाजसेविका), जयश्री श्रीखंडे (साहित्य), कुमुदिनी घोडके (कीर्तनकार), आशा साळवे (पत्रकारिता), वृषाली मरळ (ज्येष्ठ नागरिक), संगीता जोगदंड (मानवी हक्क), डॉ. निकिता पारगे (वैद्यकीय), श्रावणी घाडगे (क्रीडा), सुप्रिया पारगे (दामिनी पथक) या रणरागिनींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विष्णुपंत तांदळे म्हणाले की, महिला म्हटलं कि प्रेम, वात्सल्य, स्नेह, ममता या भावना समोर येतात. स्त्री ही एक आई असते, ताई असते, मुलगी असते, बहीण असते, सासू असते, आजी असते. विविध वेगवेगवेगळ्या भुमिका बजावत असते पण त्याआधी ती एक नारी असते. तिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, त्या विश्व शक्तीचे नाव आहे नारी, म्हणूनच त्यांचा समाजाला दिशा, स्फुर्ती देणाऱ्या महीलाचा सन्मान केल्याने आम्हाला ही आनंद झाल्याचे विष्णुपंत तांदळे यांनी सांगितले.
यावेळी गणेशनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विष्णुपंत तांदळे, सामाजिक कार्यकर्ते आण्णा जोगदंड, जयश्री श्रीखंडे, कुमुदिनी घोडके, वृषाली मरळ, संगीता जोगदंड, डॉ. निकिता पारगे, श्रावणी घाडगे, सुप्रिया पारगे, गुणवंत कामगार शंकर नाणेकर, गणेश विपट, प्रमोद वाळणकर, तात्याबा तोरसे, नामदेव शेकोकर, नागनाथ तोडकरी, रमेश रासेकर, कुमुदिनी घोडके तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागनाथ तोडकरी, कृष्णा कळसकर, राजेंद्र परदेशी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयश्री श्रीखंडे, गणेश विपट यांनी केले तर आभार गणेश नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विष्णुपंत तांदळे यांनी मानले.






















Join Our Whatsapp Group