पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने रविवारी (दि.९) सकाळी वाकड येथे कारवाई करत एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

साद यासीन सय्यद (वय १९, रा आदर्श कॉलनी, वाकड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रामदास मोहिते यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील लक्ष्मीबाई बारणे गार्डनच्या भिंतीलगत एक तरुण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून साद सय्यद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीच्या एक देशी बनावटीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहे.






















Join Our Whatsapp Group