पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात झालेल्या वादातून दोन ते तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना रात्री दहाच्या सुमारास मोशी येथे घडली आहे.

के.एस.बी चौकात चार ते पाच वाहनांची तोडफोड
गेल्या काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचे सत्र पिंपरी-चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे. बुधवारी देखील के.एस.बी चौकात अज्ञात कारणावरून चार ते पाच वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तात्काळ ॲक्शनमध्ये येऊन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर मोशीमध्ये दोन गटात झालेल्या वादातून तीन दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. भोसरी एमआयडीसी पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलेटच्या फाडफाड आवाजावरून हा वाद झाल्याचे पोलीस सांगत आहेत.






















Join Our Whatsapp Group