पिंपरी (Pclive7.com):- मुस्लिम दफनभूमीच्या देखभालीचे काम मुस्लिम संस्था व संघटनाच का? असा सवाल पिंपरी-चिंचवड युवा सेना शहर संघटक निलेश हाके यांनी महापालिकेच्या जनसंवाद सभेत उपस्थित केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व धर्मीय स्मशानभूमीचे देखभाल, व्यवस्थापन व संरक्षण या कामासाठी निविदा काढल्या जातात. हिंदू, मुस्लिम, लिंगायत, ख्रिश्चन आदी धर्माच्या नागरिकांसाठी शहरात ठिकठिकाणी स्मशानभूमी, दफनभूमी पालिकेने उभारल्या आहेत. यापैकी १५ मुस्लिम दफनभूमी आहेत. या दफनभूमीच्या देखभालीचे काम करण्यासाठी मुस्लिम संस्था व संघटना यांनीच या निविदा भरायच्या, या अटी कोणी टाकल्या, असा सवाल हाके यांनी केला. महापालिकेने हा बदल जाणीवपूर्वक केला असल्याचा आरोप निलेश हाके यांनी केला. याबाबत जनसंवाद सभेतही हाके यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.