पिंपरी (Pclive7.com):- धुलिवंदन निमित्ताने शुक्रवारी (दि.१४) रोजी शहरातील मेट्रो सेवा काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे, मेट्रो प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले आहे.
मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मेट्रोची प्रवासी सेवा दोन्ही मार्गांवर सकाळी ६ ते दुपारी ३ या वेळेत बंद असणार आहे. तर दुपारी ३ ते रात्री ११ या वेळेत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा नियमित सुरू करण्यात येणार आहे. मेट्रोचे शहरात सध्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी असे दोन मार्ग सुरू असून, सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत प्रवाशांसाठी मेट्रो सेवा सुरू आहे. मात्र, शहरात मोठ्या प्रमाणात धुळवड साजरी केली जात असल्याने मेट्रोची स्वच्छता, तसेच सुरक्षा या कारणास्तव ही सेवा बंद ठेवली जाणार आहे.