मुंबई (Pclive7.com):- भाजप, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही आपला उमेदवार विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवला आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजितदादांच्या पक्षाने संजय खोडके यांना उमेदवारी देऊन महाराष्ट्र विधानसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. संजय खोडके हे विदर्भातील पक्षाचे मोठे नेते असून ते आमदार सुलभा खोडके यांचे पती आहे. त्यामुळे आगामी काळात विधान भवनात पती-पत्नी आमदार पाहायला मिळणार आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक येत्या 27 तारखेला होणार आहे. अशातच आज (सोमवार 17 मार्च) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ आहे. परिणामी महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला तीन तर घटकपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या वाट्याला एक जागा आली आहे. तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे. त्यामुळे आता महायुतीचे पाच ही उमेदवार ठरले असून आज हे पाच ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.
विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर
भाजप
1) दादाराव केचे
2) संजय केणेकर
3) संदीप जोशी
शिवसेना
1) चंद्रकांत रघुवंशी
राष्ट्रवादी
1)संजय खोडके


















Join Our Whatsapp Group