पिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ निगडीकडून आंबोली (ता. खेड) येथील आदर्श विद्यालयात शिकायला पायपीट करून येणाऱ्या ५४ सावित्रीच्या लेकींना मोफत सायकली देण्यात आल्या. यापूर्वी निगडी रोटरीकडून ई-लर्निंग संच, विज्ञान प्रयोगशाळा साहित्य, व्हेंडिंग मशिन, वॉटर फिल्टर, सोलर, वीज सुविधा आदी साहित्य विद्यालयाला देण्यात आले आहे.
यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुहास ढमाले, प्रकल्प संचालक आश्विन कुलकर्णी, सुजाता ढमाले, माजी अध्यक्ष अरविंद खांडकर, रवी राजपूरकर, नियोजित अध्यक्ष केशव मानगे, वसंत इळवे, सविता राजपूरकर, सुनील सुरी, सुधीर शाह, जयश्री कुलकर्णी, धनश्री कुलकर्णी, बापदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश शिदे, संचालक नामदेव सावंत, बाजीराव सुतार, किसन शिंदे, प्राचार्य उत्तम पोटवडे आदी मन्यावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची शिकण्याची धडपड व बारामही होणारी पायपीट हे पाहून लक्षात घेवून क्लबने मुलींना सायकल देण्याचे ठरवले. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. तसेच पाईट येथील आर्टस् कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेजला दोन लाख रुपये खर्च करून प्रयोगशाळेसाठी साहित्य दिले. विलास आदलिंगे यांनी सूत्रसंचालन केले, सरिता घोरपडे यांनी आभार मानले.






















Join Our Whatsapp Group