पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शहरातील निधन झालेल्या मान्यवरांना श्रध्दांजली वाहून ११ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली. आजच्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.
पीसीएमटीचे माजी सभापती सुरेश चोंधे यांचे नुकतेच निधन झाले. पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण येथे झालेल्या अपघातात निगडीतील गायकवाड कुटूंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. जेष्ठ संगीतकार अरूण दाते यांचे निधन, लावणी सम्राज्ञी यमुनाताई वायकर, उत्तरप्रदेशमधील वादळात निधन झालेल्या मृतांना सभेत श्रध्दांजली वाहण्यात आली. नगरसेवक विलास मडेगिरी यांनी श्रध्दांजली वाहून सभा तहकूब करण्याची सूचना मांडली, तर सागर आंगोळकर यांनी अनुमोदन दिले.
आजच्या सभेत शिक्षण समिती स्थापन करून सदस्य नेमणूक करण्यात येणार होती. तसेच अश्विनी बोबडे आणि वसंत बोराटे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या क्रिडा,कला,साहित्य व सांस्कृतिक समिती आणि विधी समितीत नवीन सदस्य निवडण्यात येणार होते. मात्र सभा तहकूब केल्याने ११ जून पर्यंत या नेमणूका लांबणीवर गेल्या आहेत.





















Join Our Whatsapp Group