चिंचवड (Pclive7.com):- चिंचवडमधील आनंदी मैत्री प्रतिष्ठान यांचा वतीने (दि.१२) “विंझाईदेवी ताम्हिणी” जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी ३० बेंच भेट देण्यात आले आहेत.

तसेच पौंड रोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माले कॅम्प येथे एक साऊंड सिस्टीम, मुलांना जेवन करण्यासाठी जेवणाचे ३ टेबल, २ सिलिंग फँन तसेच शालेय साहित्य व नारळ व सुपारीची १० झाडे भेट स्वरूपात देण्यात आले आहेत.

या कार्यक्रमास आनंदी मैत्री प्रतिष्ठानचे सदस्य, शाळेतील शिक्षक व पालकवर्ग उपस्थित होता.