पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील महिंद्रा अँथिया या सोसायटीमध्ये १२ भटक्या श्वानांवर विषप्रयोग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत या तीन श्वानाचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणात संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात भारतीय न्याय संहिता 325 आणि प्राणी क्रूरता कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील या सोसायटीमध्ये या भटक्या श्वानाना खायला घालण्यावरून दोन गटात वाद होते. शनिवारी रात्री उशिरा या सोसायटी मधील श्वानांना खायला घालताना विषप्रयोग करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.
प्राणीहक्क कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सोसायटी परिसरात ४० भटके श्वान आहेत, त्यातील काही श्वानांना खायला घालण्यात आले त्यातील तीन श्वानाचा मृत्यू झाला असून उर्वरित श्वानाची प्रकृती गंभीर आहे.