पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने पोलीस दल व सैन्य दलात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या वीर जवानांना शौर्य पुरस्काराने, वीर पत्नी यांना सद्भावना पुरस्काराने, तर विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाजभूषण आणि महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे, माजी महापौर माई ढोरे, पोलीस उप महानिरीक्षक राजेश कुमार सिंह, अर्जुन पुरस्कार विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन, तर, उप अधीक्षक दिलीप शिंदे, शिवसेनेच्या उप नेत्या सुलभाताई उबाळे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त ‘शुरा आम्ही वंदिले’ या कार्यक्रमाचे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, गणेश वंदना आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.अमर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी महापौर माई ढोरे, पोलीस उप महानिरीक्षक राजेश कुमार सिंह,पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे, प्रभाकर मोहोळ, शिवसेनेच्या उपनेत्या सुलभाताई उबाळे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख खंडूशेठ चिंचवडे, असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर डामसे, सचिव शुभम चिंचवडे, सुनील हगवणे, रोहित चिंचवडे, भारतीय माजी सैनिक संघ पुणे जिल्हा अध्यक्ष यशवंत महाडिक, कृषी पुरस्कार विजेते कैलास जाधव, विनेश भोजे, सचिन लाड, कमलजित सिंग, रामचंद्र बांगर, ॲड. गणेश मोहोळ, हिरामण बोडके, नितिन बहिरट,स्वरूपाताई खापेकर, सायली साळवी, राकेश सायकर, संग्राम लाड, श्रीकांत खुळगे, भगनान शिंदे , ज्ञानेश्वर कदम, दिपक खोपकर, राजु पाटील, आशिष सातकर, विनायक जगताप, विजय महाजन, विनायक येवले, केशव त्रिभुवन, अमोलराजे इंगळे, राजु पाटील, किरण गांधी,संदिप कल्हाटकर, मंगेश शेलार, बजरंग रंधवे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, की समाजात शांतता नांदावी, सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी पोलीस व भारतीय जवान अहोरात्र प्रयत्न करीत असतात. त्यांना सन्मानित केल्याने त्यांना अधिक बळ मिळणार आहे. पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन सारख्या संस्था यादृष्टीने पुढे येत आहेत, हे स्वागतार्ह आहे.
पद्मश्री मुरलीकांत पेटकर म्हणाले, की पुरस्काराने आयुष्याचे सोने झाल्यासारखे वाटते. आजपर्यंत ४७६ सुवर्णपदके मिळवली, म्हणून केंद्र सरकारने मला ‘पदकांचा राजा’ ही उपाधी दिली आहे. पिंपरी चिंचवडनेही खूप प्रेम दिले आहे.
संस्थापक, अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी प्रास्ताविक करीत पोलीस फ्रेंड्स असोसिएशनच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी, तर आभार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विनेश भोजे यांनी मानले.
कर्तबगार जवान, पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान :
शौर्य पुरस्कार (सेनादल) : कीर्तीचक्र विजेते संतोष राळे, कारगिल योद्धा रामदास मदने, कॅप्टन ए. के.मिश्रा, कारगिल योद्धा दत्ता सांगळे, १९६५ च्या युद्धातील सहभागी ए. एम. संगीतराव, एम. एन. भराटे, १९७१च्या युद्धातील योद्धा दत्तात्रेय कुलकर्णी व मेजर वाय. एम. महाडिक, १९६५ व १९७१ च्या युद्धातील योद्धे लक्ष्मण भोसले, हनुमंत साळुंके, संभाजी घारगे.
शौर्य पुरस्कार (पोलीस दल) : पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे, चिंचवड वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर डामसे, सीआरपीएफ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय काशीद
समाजभूषण पुरस्कार : शिवसेनेच्या उपनेत्या सुलभाताई उबाळे, पंढरपूरचे नगरसेवक विक्रम शिरसाट, लक्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष रोशन मराठे, वास्तुशास्त्र सल्लागार जितेंद्र जोईल, नवतरुण मित्र मंडळ चिंचवडगाव चिंचवडगाव, मेदनकरवाडीचे उपसरपंच संजय वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ इंगळे, मुकुंद गुरव, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे स्वीय सहाय्यक सुनील हिरुकर, शुभम कुंभोजे, एसएनबीपी स्कुलच्या संचालिका ऋतुजा भोसले, धाराशिवचे सामाजिक कार्यकर्ते अनंतराव घोगरे पाटील.
आदर्श पत्रकार : संदेश पुजारी,
समाजगौरव: वैद्यकीय अधिकारी विनायक पाटील, डॅाक्टर तनप्रित कौर,
आदर्श सोसायटी आनंदवन सोसायटी,
विशाल संपूर्ण आरोग्य संस्था,
रत्न विशारद सार्थक गांधी,
गणेश उदास,
अनिल शेंडे.