पिंपरी (Pclive7.com):- ‘गॅस दरवाढ करणारे मोदी सरकार हाय हाय’, ‘मोदींची महिलांना महागाईची भेट… गॅस दरवाढीत थेट ५० रुपयांची वाढ’, ‘गोरगरीब जनतेची लूट करणाऱ्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध’ अशी जोरदार घोषणाबाजी करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला रणरागिणींनी भरचौकातच चूल पेटूवन भाकरी थापल्या. लाडक्या बहिणींना २१०० रुपयांऐवजी ५०० रुपये जमा करण्यात येत असल्याचाही यावेळी निषेध करण्यात आला.
शहर शिवसेनेच्या वतीने झालेल्या या आंदोलनात शहरप्रमुख संजोग वाघेरे-पाटील, जिल्हाप्रमुख, ॲड. गौतम चाबूकस्वार, महिला आघाडीच्या शहर संघटिका रूपाली आल्हाट, जिल्हा उपप्रमुख हाजी दस्तगीर, चिंचवड विधानसभाप्रमुख हरेश नखाते, निवडणूक प्रभारी अशोक वाळके, युवासेनेचे शहर उपअधिकारी निखिल दळवी, भोसरी विधानसभा संघटिका गौरी घंटे, शहर उपप्रमुख राजाराम कुदळे, अनिल सोमवंशी, दिलीप सावंत, अशोक जाधव, रमेश नरवडे, विभागप्रमुख संदीप भालके, गोरख पाटील, सतीश मरळ, प्रदीप महाजन, अनिल दुराफे, संजय वारे, गोविंद शिंदे, युवराज कोकाटे, कैलास नेवासकर, अशोक वाळके, बळवंत दाटकर, विभाग संघटिका सुजाता नखाते, रोहिणी बोराटे, सुजाता आल्हाट, पूनम रिटे, साधना काशिद, तस्लिम शेख, करुणा भुजबळ, बेबी सय्यद, योगेश बोराटे, मारुती तांबवड, दीपक पाटील, दत्तात्रय पाडे, विजय चव्हाण, बाळू जम, धनश्याम कुदळे, राजू निकम, अमोल बोंबले, दीपक भक्त आदी उपस्थित होते.

शहरप्रमुख संजोग वाघेरे-पाटील म्हणाले, ‘वाढत्या महागाईमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. दरवाढ त्वरित मागे घ्यावी.’ महिला आघाडीच्या शहर संघटिका रूपाली आल्हाट म्हणाल्या, ‘भाजप नेतृत्वाखालील सरकारने गॅस दरवाढ करून गरिब जनतेला नाहक त्रास दिला आहे.’






















Join Our Whatsapp Group