चिंचवड (Pclive7.com):- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रहाटणीतील नखाते नगर येथील आनंद बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी आमदार शंकर जगताप यांनी जयंती सहभागी होत उपस्थित अनुयायांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विहाराच्या वतीने साकारण्यात आलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेविका सविता खुळे माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नरेश खुळे, प्रा. डॉ. प्रकाश चौधरी, आनंद मित्र मंडळाचे अध्यक्ष महादेव कांबळे, सचिव पोपट कदम, खजिनदार शशिकांत शेलार, महिलाध्यक्ष अनिताताई साळवे, अंजनाताई कांबळे, शांताताई कांबळे, एकनाथ मंजाळ, राहुल भोसले, सखाराम कांबळे, रामा मुळे, प्रकाश सूर्यवंशी, निलेश मुळे, बनशी शिंदे, महेंद्र गायकवाड, सखाराम कांबळे, रमेश कांबळे, अनिताताई कांबळे, पंढरीनाथ सूर्यवंशी, डॉ. भीमराव सरवदे, प्रा. उगले सर, अभियंता विजय कांबळे, रवी कांबळे, प्रा. प्रभाकर दाभाडे, रुपालीताई लोखंडे तसेच आनंद मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group