पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक स्थायी समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर भालेराव यांचे आज (दि.१९) सकाळी दुःखद निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.
ज्ञानेश्वर भालेराव हे आकुर्डी गावठाण प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करत होते. पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तारूढ पक्षनेता, दोन टर्म नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती पद त्यांनी भूषवले होते. २००९ साली स्थायी समिती सभापती पदी त्यांची निवड झाली होती.

निगडी येथील स्मशानभूमी येथे आज (दि.१९) सायंकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केला जाणार आहे.




















Join Our Whatsapp Group