पिंपरी (Pclive7.com):- घरासमोरून ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून १७ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अनिकेत उत्तम कदम (वय २८, सध्या रा. सुभाषवाडी, निघोजे ता. खेड, जि. पुणे, मूळगाव, जवळे कडलग, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. महाळुंगे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन गिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ एप्रिल रोजी जमादार वस्ती, निघोजे येथून अमर येळवंडे यांच्या घरासमोरून महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरीला गेला होता.

७० सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शेध घेत पोलिसांनी आरोपी निष्पन्न केला. त्यास ताब्यात घेतले असता त्याने जाधववाडी, चिखली येथून एक पिकअप चोरून नेल्याची कबुली दिली. आरोपीवर यापूर्वी दिघी, संगमनेर व एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून पोलिसांनी बोलेरो पिकअप व ट्रॅक्टर असा एकूण १७ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन गिते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रविण कांबळे, सहा. पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, सहायक पोलीस फौजदार राजु जाधव, राजेंद्र कोणकेरी, पोलीस हवालदार अमोल बोराटे, युवराज बिराजदार, विठ्ठल वडेकर, तानाजी गाडे, किशोर सांगळे, पोलीस नाईक संतोष काळे, शिवाजी लोखंडे, मंगेश कदम, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, अमोल माटे, राजेश गिरी, शरद खैरे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group