भोसरी (Pclive7.com):- भोसरी येथील सचिन दादा लोंढे यांच्या विशेष प्रयत्नातुन मोफत ई श्रम कार्ड वाटप करण्यात आले. रविवार (दि.२०) रोजी शांतिनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहारात ई श्रम कार्डचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रचंड गर्दी करुन सुमारे ५०० जणांनी आपले ई श्रम कार्ड काढून घेतले आहे.
ई श्रम कार्ड चे फायदे..
अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास २ लाख रुपये अनुदानाची रक्कम मिळत आहे. ई श्रम मार्फत विविध प्रकारचे सामाजिक सुरक्षा लाभ वितरीत केले जात आहे. आपत्ती किंवा महामारीसारख्या कठीण परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारकडुन मदत मिळणे सोईस्कर होत आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम योगेश जाधव यांच्या पुढाकाराने पार पाडला आहे.
























Join Our Whatsapp Group