निगडी येथील नूतनीकरण केलेल्या भव्य शोरूमचे मोठ्या उत्साहात उद्घाटन
पिंपरी (Pclive7.com):- सत्यम ज्वेलर्स पिंपरी-चिंचवड परिसरातील एक विश्वासार्ह आणि पारंपरिक नाव, मागील ४२ वर्षापासून ग्राहकांच्या मनात आपल्या दर्जेदार दागिन्यांनी आणि परंपरेशी असलेल्या नात्याने विशेष स्थान मिळवत आले आहे. आता सत्यम ज्वेलर्सने एका नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. काल, २० एप्रिल २०२५ रोजी, निगडी येथील त्यांच्या नव्याने नूतनीकरण केलेल्या शोरूमचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि हजारो लोकांनी उपस्थित राहून नवीन दागिन्यांचे संग्रह आणि शोरूमचा अनुभव घेतला. ही केवळ एक दुकानाची सुरुवात नव्हे, तर एक नवी ऊर्जा, नवे स्वप्न आणि एक नवीन युग आहे. सत्यम ज्वेलर्सने आपल्या तीन शोरूम्स – निगडी, कृष्णानगर आणि चाकण मधून पिढ्यानपिढ्या ग्राहकांची सेवा केली आहे.

मातांनी आपल्या लग्नात घातलेली सत्यमचे दागिने आज त्यांच्या मुली-सुना घालतात आणि वेळोवेळी सत्यम ज्वेलर्स मध्ये जाऊन नव्या व्हरायटीचे दागिने घेतात, हेच सत्यमचे खरे यश आहे. या नव्या शोरुममध्ये ग्राहकांना मिळतोय एक स्टाईलिश आणि शांत अनुभव खासकरून नववधूसाठी सादर करण्यात आलेला पीसीएमसीमधील पहिला ब्राइडल लाउंज’ ही या नव्या टप्प्याची खरी ओळख आहे. या लाउंजमध्ये दागिन्यांची निवड करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन, आणि साजेशी जागा मिळते – जिथे नववधू तिच्या लग्नाच्या प्रत्येक प्रसंगासाठी दागिने निवडू शकते.

या भव्य उद्घाटनप्रसंगी माजी सभापती स्थायी समिती सौ. सुमनताई पवळे, माजी उप-महापौर सौ. शैलजाताई मोरे, मा. नगरसेविका सौ. शर्मिलाताई बाबर, सौ. कमलताई घोलप, भाजपा उपाध्यक्ष समीर जावळकर, उद्योजक ज्ञानेश्वर कडू, उद्योजक श्री. साने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित ग्राहक, महिला मंडळ, स्थानिक उद्योजक आणि व्यावसायिकांनीही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. सत्यम ज्वेलर्सने सर्व उपस्थितांचे आणि त्यांच्या शुभेच्छांचा मनःपूर्वक स्वीकार करत आभार मानले आहेत.
या शोरुममध्ये सादर करण्यात आलेले राजवाडी आणि ॲटिक कलेक्शन्स यांचे विशेष आकर्षण ठरत आहे. राजवाडी डिझाइन्समध्ये शाही थाट, बारीक नक्षीकाम आणि रॉयल लुक दिसतो, तर ॲटिक कलेक्शनमध्ये पारंपरिकतेचा वारसा आणि आधुनिकतेची झलक आहे. तसेच, नववधूसाठी सादर करण्यात आलेले हलके वजनाचे फ्यूजन दागिने, ऑफिस वियर आणि प्री-वेडिंग फंक्शनसाठी योग्य असलेले ट्रॅडी सेट्स, कपल रिंग्स यांचा संग्रह महिलांना आकर्षित करत आहे. नव्या दालनाच्या अगदी बाजूलाच “Satyam Silver” हे एक खास चांदीच्या वस्तूंसाठी समर्पित दालन आहे- येथे धार्मिक उपयोगाच्या वस्तूंपासून ते भेटवस्तूंपर्यंत सर्व काही दर्जेदार स्वरूपात उपलब्ध आहे. या प्रसंगी बोलताना मालक श्री. किरणराज चोपडा म्हणाले, “ही माझी खूप जुनी स्वप्नपूर्ती आहे. मला खूप आनंद आहे की, पीसीएमसी परिसरातील लोकांच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार त्यांना दर्जेदार आणि क्लासिक दागिने सादर करता येत आहेत.

आमचे हे नव्याने उभारलेले ब्राइडल लाउंज आणि विशेष कलेक्शन्स ग्राहकांना खूप आवडतील, याचा मला विश्वास आहे. आम्ही सर्व पिंपरी-चिंचवडवासीयांना आग्रह करतो की त्यांनी एकदा तरी आमच्या शोरुमला भेट द्यावी आणि आमच्या खास ऑफर्सचा लाभ घ्यावा.” स्थळः कोहिनूर आर्केड, टिळक चौक, निगडी, पुणे-४११०४४ खास ऑफर्स (५ मे २०२५ पर्यंत वैध): गोल्ड ज्वेलरी मेकिंग चार्जवर थेट २०% सूट, डायमंड ज्वेलरी मेकिंग चार्जवर थेट ५०% सूट, जितकं सोनं, तितकी चांदी मोफत चांदी!
सत्यम ज्वेलर्सचा हा नवा टप्पा म्हणजे परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा एक सुंदर अनुभव आहे -जिथे प्रत्येक दागिना एक गोष्ट सांगतो आणि प्रत्येक भेट एक आठवण बनते. ही केवळ खरेदी नाही, ही भावना आहे – आणि हेच सत्यम ज्वेलर्सची खरी ओळख आहे.