भोसरी (Pclive7.com):- कोयत्याचा धाक दाखवत एका भंगार व्यावसायिकाकडे दरमहा पाच हजारांची खंडणी मागितली. ही घटना मंगळवारी (दि.२९) सकाळी दहा वाजताच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथे घडली.

दत्ता बबन खंडागळे (वय २६, रा. विठ्ठल नगर, लांडेवाडी, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजू विश्वंभर जाधव (वय ३२, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी मंगळवारी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी राजू जाधव यांचा लांडेवाडी भोसरी येथे भंगाराचा व्यवसाय आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ते आपल्या दुकानात बसले होते. त्यावेळी आरोपी दत्ता खंडागळे हा तेथे आला. तो फिर्यादी यांना म्हणाला की, मला पाच हजार रुपये दे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. मी इथला भाई आहे. मला प्रत्येक महिन्याला तू पाच हजार रुपये द्यायचे, असे म्हणत शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने मारहाण केली.