पिंपरी (Pclive7.com):- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शाखा आणि पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने परशुराम जयंतीचे औचित्य साधून चैत्रगौर हळदीकुंकू समारंभ अतिशय जोरदारपणे पार पडला. या कार्यक्रमासाठी सुमारे ४०० महिला उपस्थित होत्या.
चैत्रगौर सजावट अतिशय व सुंदर आरास केली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पेहेलगाम येथे घडलेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन माननीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विष्णुसहस्त्रनामाचे पठण आणि परशुरामांचे स्तोत्रही पठण करण्यात आले. शृंगेरी मठ येथे जाऊन भगवतगीता कंठस्थ करून संपूर्ण गीता पठण करण्या मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल प्रियाताई जोग यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

स्वच्छंदी मंगळागौर ग्रुप मंगळागौरीच्या खेळाचे अतिशय सुंदर सादरीकरण करण्यात आले. अत्यंत उत्साही वातावरणात सर्व कार्यक्रम छान पार पडला महिलांची संख्या वाखाण्याजोगी होती. हळदी कुंकू, डाळ कैरीचे पन्हे, हरबरे ओटी देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुषमा ताई वैद्य, वैशालीताई कुलकर्णी, कविताताई बारसावडे, संध्याताई कुलकर्णी, आरती कोशे, संगीता कुलकर्णी, संपदा गुपचूप, मनालीताई राजवाडे, सुनिधीताई, मधुवंती वखरे, साक्षीताई जोशी, धनश्रीताई देशमुख, नेहाताई साठे, पूर्वा बारसावडे, ऋजुता कुलकर्णी या सर्वांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रम प्रसंगी दिलीप कुलकर्णी यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. तर शहर अध्यक्ष सचिन कुलकर्णी, महेश बारसावडे, मकरंद कुलकर्णी, शामकांत कुलकर्णी, भाऊ कुलकर्णी, अभय कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, आनंद देशमुख, संजय परळीकर, भूषण जोशी हे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी दिलीप कुलकर्णी यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. तर शहर अध्यक्ष सचिन कुलकर्णी, महेश बारसावडे, मकरंद कुलकर्णी, शामकांत कुलकर्णी, भाऊ कुलकर्णी, अभय कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, आनंद देशमुख, संजय परळीकर, भूषण जोशी हे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. सूत्रसंचालन मधुवंती वखरे यांनी केले, तर आभार संध्या कुलकर्णी यांनी मानले.