पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या १९ वर्षाखालील मुलींच्या मर्यादित २५ षटकांच्या पिंपरी चिंचवड क्रिकेट करंडक स्पर्धेत ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमीने विजेतेपद मिळवले. तर स्कोअर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी उपविजेती ठरली आणि दिवेकर क्रिकेट अकॅडमीला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.
पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या १९ वर्षाखालील मुलींच्या मर्यादित २५ षटकांच्या पिंपरी चिंचवड क्रिकेट करंडक साठीच्या आज आठव्या दिवशी सकाळच्या सत्रात तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत दिवेकर क्रिकेट अकॅडमीने परंदवाल गर्ल्स संघावर ६ गडी राखून विजय मिळविला. या सामन्यात सिद्धी लोणकर सामनावीर ठरली.
परंदवाल गर्ल्सने पहिल्यांदा प्रथम फलंदाजी करताना मर्यादित २० षटकात ६ बाद ५९ धावा केल्या; उत्तरा दाखल दिवेकर क्रिकेट अकॅडमीने ३ गडी गमावून ही धावसंख्या पार केली व स्पर्धेचा तिसरा क्रमांक मिळविला. परंदवाल गर्ल्स २० षटके ६ बाद ५९ धावा:- अन्वी दर्शले ८,अनुष्का वाकोडे ६,अनघा आहेर २२/२, यशस्वी वाघमारे १०/१, तन्वी पाटील ४/१ सिद्दी लोणकर ०/१, साची अदावडे २/१.
दिवेकर क्रिकेट ॲकॅडमी १४.५ षटके ३ बाद ६० धावा आराध्या ढोरे ६, साची अदावडे ९, मेघना मोळे ३/१ संस्कृती पाटील ४/१, अन्वी दर्शले १०/१.या सामन्यात सिद्धी लोणकर सामनावीर ठरली.नरेंद्र कदम यांच्या हस्ते तिला सामनावीर पारितोषिक देण्यात आले.

अंतिम फेरीत स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी विरुद्ध ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमी यांची गाठ पडली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीने २५ षटकांमध्ये ५ बाद १४१ धावा केल्या:- समीक्षा पवार ५४ ,आर्या चिखलीकर १४, सानिका शिंदे ४८ ,अदिती लांडे १८/२ सोमय्या भामरे १९/१ शर्वरी खिलारी २०/१.
ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमी २३.२ षटके १ बाद १४३ धावा :- आर्या जांभुळकर ५७ निहिरा शर्मा ६४ गौरी मिंडे २०/१.
सामनावीर निहिरा शर्मा हिला विजय कोतवाल यांच्या हस्ते सामनावीर पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेमध्ये ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमीने विजेतेपद मिळवले तर स्कोअर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी उपविजेती ठरली आणि दिवेकर क्रिकेट अकॅडमीला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपसचिव विजयसिंह मोहिते, खजिनदार संजय शिंदे, सदस्य नरेंद्र कदम, युसूफ बऱ्हानपुरे, मुकेश गुजराथी, प्रदीप वाघ, विजय कोतवाल व प्रवीण बनसोडे हेही उपस्थित होते. यास पारितोषक वितरणाचे सूत्रसंचालन प्रदीप वाघ यांनी केले व आभार प्रदर्शन संजय शिंदे यांनी केले.
या स्पर्धेमध्ये १)उत्कृष्ट फलंदाज समीक्षा पवार (स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी), २)उत्कृष्ट गोलंदाज अस्मिता शिंदे (स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी ३)अष्टपैलू खेळाडू वैष्णवी म्हाळसकर (परंदवाल गर्ल्स) या ठरल्या.























Join Our Whatsapp Group