चिंचवड (Pclive7.com):- चिंचवडगाव परिसरातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हेमंत डांगे युथ सोशल फाउंडेशनतर्फे गुणगौरव समारंभाचे आयोजन केले आहे.

या उपक्रमाअंतर्गत दहावी आणि बारावीच्या परिक्षेत ६५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिका व आधार कार्डच्या झेरॉक्स प्रती डांगे बिल्डिंग, त्रिमूर्ती बिल्डिंग शेजारी, चिंचवडगाव येथील जनसंपर्क कार्यालयात आणाव्यात किंवा ९०२११६५०६५ / ९७१६८९२३४५ या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे पाठवाव्यात, असे आवाहन आयोजक हेमंत डांगे यांनी केले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना त्यांच्या यशाला प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत असल्याचे हेमंत डांगे यांनी सांगितले आहे.























Join Our Whatsapp Group