आळंदी (Pclive7.com):- वारकरी सांप्रदायाचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळू लागली आहे. गेल्या आठवड्याभरापासून पाण्यातील प्रदूषण वाढू लागलं आहे. पालखी सोहळा अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला असताना इंद्रायणी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोणावळ्यापासून उगम पावलेल्या या इंद्रायणी नदीत रसायनयुक्त आणि मैलामिश्रित पाणी सोडलं जात आहे. परिणामी आळंदीत हे असे चित्र गेल्या दहा वर्षांपासून पहायला मिळत आहे. पालखी सोहळा महिनाभरावर येऊन ठेपला असताना राज्य सरकार मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी हा खेळ सुरु असून हा खेळ सरकार कधी थांबवणार असा प्रश्न नेहमी विचारला जात असून तो प्रश्न आजपर्यंत अनुत्तरितच राहिला आहे.