पिंपरी (Pclive7.com):- वैष्णवीच्या प्रकरणात आज (दि.२८) हगवणे कुटुंबियांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळं पती, सासू, नणंद असं तिघांना आणि सासरा आणि दिर असं दोघांना स्वतंत्ररित्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. याच प्रक्रियेसाठी हगवणे कुटुंबाला पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं आहे.

आज दुपारी अडीचच्या सुमारास पुणे सत्र न्यायालयात पुढची सुनावणी होणार आहे. न्यायालय या पाच ही आरोपींच्या पोलीस कोठडीत की न्यायालय कोठडीत रवानगी करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे हिने आत्महत्या केली. याप्रकरणी तिचे वडील आनंद ऊर्फ अनिल बाळासाहेब कस्पटे यांनी बावधन पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वैष्णवीचा पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा यांना १८ मे रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, वैष्णवीचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे हे दोघे पसार होते. अखेर पोलिसांनी त्यांना पुण्यातून अटक करण्यात आली होती. त्यांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती.























Join Our Whatsapp Group