मावळ (Pclive7.com):- गेल्या आठवड्यापासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणात बुधवारी (दि.२८) २९ टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच, पवना नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे.

अवकाळीनंतर राज्यात मान्सूनच्या पावसानेही हजेरी लावली आहे. बुधवारी पावसाचा जोर ओसरला होता, मात्र रिपरिप सुरू होती. दिवसभरात धरण क्षेत्रात १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे पवनानदी क्षेत्रातील ओढे, नाले, झरे व धबधबे वाहू लागले आहेत. ते पाणी पवना धरणात जमा होत आहे.
आतापर्यंत एकूण ३६३६ मिलिमीटरचा पाऊस झाला आहे. धरणात २९ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात पाण्याची पातळी ६०३.२० मीटर इतकी आहे, अशी माहिती पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश वारिया यांनी दिली.























Join Our Whatsapp Group