पुणे (Pclive7.com):- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) प्रवासी सेवेची भाडेवाढ आज, रविवारपासून (१ जून) लागू झाली आहे. नवीन दररचनेनुसार, १ ते ५ किमी अंतरासाठी आता दहा रुपये मोजावे लागणार आहेत, तर पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीत दैनंदिन पास ४० ऐवजी ७० रुपयांना, पीएमआरडीए हद्दीत १२० ऐवजी १५० रुपयांना, तर मासिक पास ९०० ऐवजी दीड हजार रुपयांना झाल्यामुळे आजपासून ‘पीएमपीएमएल’ प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत पीएमपीच्या १ हजार ६०० बस धावतात. पीएमपीची गेल्या ११ वर्षांपासून भाडेवाढ करण्यात आली नव्हती. राज्य परिवहन मंडळ, बेस्ट, तसेच नागपूर शहर बससेवा यांनी केलेल्या तिकीट दरवाढीच्या आधारावर पीएमपीने नव्याने दरवाढीचा प्रस्ताव करून संचालक मंडळाची मान्यता घेतली. त्यानुसार, एक जूनपासून पहिल्या दोन किलोमीटर अंतरासाठी दहा रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी दोन किलोमीटरसाठी पाच रुपये भाडे आकारले जात होते.
१ ते ३० किलोमीटर अंतरासाठी पाच किलोमीटरच्या अंतराने विविध टप्पे, तर त्यापुढील ३० ते ८० किलोमीटर अंतरासाठी दहा किलोमीटरच्या अंतराने पाच टप्पे अशा एकूण ११ टप्प्यांमध्ये नवीन तिकीटदर निश्चित करण्यात आले आहेत.

अशी भाडेवाढ करण्यात आली
पहिला टप्पा : ५ किलोमीटरपर्यंत – १० रुपये
दुसरा टप्पा : ५.१ ते १० किमी – २० रुपये
तिसरा टप्पा : १०.१ ते १५ किमी – ३० रुपये
चौथा टप्पा : १५.१ ते २० किमी – ४० रुपये























Join Our Whatsapp Group