पिंपरी (Pclive7.com):- सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे…. अशी चिठ्ठी लिहून हिंजवडीतील एका 25 वर्षीय आय टी अभियंता तरुणीने 21 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीच्या 21 व्या मजल्यावरून उडी घेत अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे या 25 वर्षीय तरुणीने आपलं जीवन संपवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे 4 :30 सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारात आली. त्यानंतर तिने लिफ्टने 21 व्या मजल्यावर आपल्या घरी जात पहाटे 4. 42 सुमारास तिने आत्महत्या केली.
अभिलाषाच्या शव विच्छेदन अहवालात तिच्या शरीरावरिल महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याच नमूद करण्यात आल आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषा च्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली असून , या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काही संकेत आढळून आले नसल्याचे सांगितल आहे .
प्राथमिक दृष्ट्या तिने नैराश्यातून आत्महत्या किल्ल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिच्या खोलची झाडाझडती घेतली असता तिने लिहिलेल एक सुसाइट नोट सापडली आहे , त्यावर सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे…. असं लिहिलेलं आढळून आल आहे. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.