माजी नगरसेवक विनायकदादा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीर संपन्न
वाकड (Pclive7.com):- वाकड परिसरातील वेणूनगर जेष्ठ नागरिक संघ यांनी जागतिक दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन केलेले होते. यामध्ये वाकड परिसरातील विविध भागातील ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ भगिनींनी सहभाग नोंदविला.

यावेळी योगशिक्षक विजयकुमार जाजू यांनी विविध योग प्रकार घेत शिबीर संपन्न केले. तदनंतर ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्यांनी योग प्रकाराचे महत्त्व आपल्या जीवनावरील त्याचा परिणाम आणि त्यातून मिळणारे फायदे याचे महत्त्व सर्वांना समजावून सांगितले.
वेणूनगर ज्येष्ठ नागरिक संघ येथे योगशिक्षक श्री.विजयकुमार जाजू, सौ. सुरेखा रहाटे, श्री. वाघमारे, श्री. पवार सौ. मीरा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज वाकड परिसरातील ज्येष्ठ नागरिक योगाभ्यास व विविध योग प्रकार यांचा अभ्यास करत असतात. यामध्ये महिला व पुरुष दररोज सराव करीत असतात.
आज पार पडलेल्या जागतिक योग दिन शिबिरामध्ये योगशिक्षक विजयकुमार जाजू यांनी नावीन्यपूर्ण योग साधनांचा अभ्यास घेतला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष श्री. मधुकर रहाटे, माजी नगरसेवक विनायकदादा गायकवाड, योगाशिक्षक व मंडळाचे सर्व सदस्य सहभागी झालेले होते.






















Join Our Whatsapp Group